अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी!

इलाहाबाद | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. या ठरावाच्या बाजूने 174 सदस्यांनी मतदान केलं असून हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत असल्याचे पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी जाहीर केलं.

इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले असून विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील हे स्पष्ट झालं आहे.

इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय मतदान प्रक्रियेत सहभागी झाला नाही. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी पंतप्रधान निवासस्थान सोडलं.

पीटीआयचे खासदार फैसल जावेद यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘त्यांनी सभ्यतेने पदभार सोडला आणि नतमस्तक झाले नाही.

शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत आणि ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे अध्यक्ष आहेत.

अविश्वास ठराव जिंकल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी संसदेत सांगितलं की, ‘आज पुन्हा पाकिस्तानमध्ये संविधान आणि कायदा आला आहे. आम्ही कोणावरही सूड घेणार नाही, अन्याय करणार नाही. आम्ही निरपराधांना तुरुंगात पाठवणार नाही. कायदा मार्गी लागेल. आम्ही बिलावल भुट्टो आणि मौलाना फजलूर (युती पक्षांचे नेते) यांच्यासोबत सरकार चालवू, असं ते म्हणालेत.

इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांना 342 सदस्य असलेल्या सभागृहात 172 सदस्यांच्या पाठिंबा आवश्यक होता. अविश्वास ठरावाच्या बाजूने 174 मते पडली आहेत. मतदानानंतर सभागृहातील विरोधी पक्षांनी गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एक मोठी कारवाई 

  Maharashtra Kesari 2022: कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

  Gold Rate : सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

  उद्यापासून कोरोनाच्या Booster डोसला सुरुवात, केंद्रानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

  “शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”