शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एक मोठी कारवाई

मुंबई | ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर संतप्त  एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला आहे. यावरुन सध्या राज्यातील वातावरण जोरदार पेट घेत आहे.

शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी अचानक हल्ला झाला होता. मोठा जमाव चालून आला आणि त्यांनी घराच्या गेटमधून आत शिरत पवार यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

या हल्ल्यात दगडफेक आणि चप्पलफेकही करण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर स्थिती नियंत्रणात आली. या संपूर्ण घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर हल्ला प्रकरणात राज्य सरकारकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवलं असून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणा, पोलीस यांचं फेल्युअर असल्याचं म्हटलं गेलं.

ज्या ठिकाणी हल्ला होतो त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पोहोचतात मग पोलीस का नाही पोहोचू शकत असाही प्रश्न उपस्थित झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार गृह विभागाने मुंबई शहराचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून चौकशी करून अहवाल सादर केला आहे.

शरद पवार यांच्या घरावर आंदोलन करण्याआधी या भागाची रेकी करण्यात आली होती, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी सिल्व्हर ओक येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यात घटनेच्या आधीपासूनच या भागात काही व्यक्ती संशयास्पदरित्या हालचाली करत होत्या, असे दिसून आले आहे.

शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरुन सध्या वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

  Maharashtra Kesari 2022: कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

  Gold Rate : सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

  उद्यापासून कोरोनाच्या Booster डोसला सुरुवात, केंद्रानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

  “शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”

  आताची सर्वात मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी