भारतातील मुस्लीम आनंदी, इम्रान खान यांनी चिंता करु नये; अदनान सामीनं सुनावलं

नवी दिल्ली | राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशात अशांतता आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही यावरुन भारतावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर बाॅलिवूड गायक अदनान सामीने इम्रान खान यांचा समाचार घेतला आहे.

भारतात राहत असल्याचा मुस्लिमांना अभिमान असून ते इथे आनंदी आहेत, असं उत्तर अदनान सामीने इम्रान खान यांना दिलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याचा भंग आहे. तसेच भारताने पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन केले आहे, अशी टीका इम्रान खान यांनी केली होती. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं.

अदनान सामी इम्रान खान यांच्यावर चांगलेच बरसले आहेत. तुम्ही भारतातल्या मुस्लिमांची चिंता करणे सोडून द्या. तुमच्या देशातील नागरिकांची काळजी करा, असं त्यानं सुनावलं आहे.

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तान या देशातील हिंदू, बौद्ध, शीख, पारशी, जैन आणि ख्रिश्चन धर्मीयांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-