ढोलकीच्या तालावार राहुल गांधींनी धरला ठेका; पाहा व्हीडिओ

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच राजकारणात चर्चेत राहतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं ते आणि कॉंग्रेस पक्ष नेहमी अडचणीत सापडतो. दरम्यान आता राहुल गांधी यांच्यातील एक वेगळंच व्यक्तिमत्व समोर आलं आहे.

रायपूर येथील येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवात छत्तीसगडमधील आदिवासी समाज बांधवांच्या एका कार्यक्रमात राहुल गांधींनी चक्क आदिवासी नृत्यावर ठेका धरला. नृत्य करताना राहुल गांधींनी ढोलक अडकवला होता. तर त्यांच्या डोक्यावर पारंपरिक मुकूटही दिसत होता. स्थानिक लोकभाषेत गायल्या गेलेल्या गीतावर राहुल यांनी नृत्य केलं.

देशभरात सध्या नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवरून वक्तव्ये आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा तणावपूर्ण वातावरणात राहुल गांधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदाच्या मूडमध्ये दिसले. राहुल गांधी यांच्या नृत्याच्या व्हीडिओमध्ये त्यांच्यासोबत माजी लोकसभा सभापती मीरा कुमार या देखील दिसत आहेत.

दरम्यान, राहुल नृत्य करत असल्याचं पाहून मीरा कुमारही आनंदी मूडमध्ये दिसत आहेत. व्हिडिओत त्या टाळ्या वाजवून सर्वांचा उत्साह वाढवतानाही दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-