रशियामुळे पाकिस्तानची गोची; जो बायडन यांच्या इशाऱ्याने इम्रान खान यांचं टेन्शन वाढलं

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धामुळं सध्या अवघ्या जगाचं टेन्शन वाढलं आहे. रशियन सैन्य वेगवान हालचाली करत युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशात जग दोन गटात विभागलं जाण्याची शक्यता आहे.

युक्रेन-रशिया युद्धामुळं रशियाच्या बाजूनं आणि युक्रेनच्या बाजूनं उभा ठाकण्याची वेळ अनेक देशांवर येत आहे. युक्रेनच्या बाजूनं उभं राहीलं तर रशियाशी संबंध ताणले जाण्याची तर रशियाच्या बाजूनं उभं टाकलं तर नाटोचा सामना करावा लागण्याची भिती अनेक देशांना सतावत आहे.

अवघ्या जगाचं लक्ष सध्या भारताच्या भूमिकेकडं लागलं आहे. अशातच भारताचा शेजारी पाकिस्तान मात्र मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान नुकतंच रशियाच्या दौऱ्यावर गेले होते.

इमरान खान ज्यावेळी रशियात होते त्याचवेळी पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. परिणामी आता इमरान खानचा दौरा पाकिस्तानला फायद्याचा ठरण्याऐवजी तोट्याचा ठरण्याची शक्यता वाढली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्या सर्व राष्ट्रांना इशारा दिला आहे जे राष्ट्र सध्या युद्धात रशियाच्या बाजूनं उभं ठाकले आहेत. पाकिस्ताननं जाहीरपणे रशियाची बाजू घेतली नसली तरी इमरान खान यांच्या दौऱ्यामुळं पाकिस्तानला निर्बंधांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान आपले आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यावर सध्या भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून कित्येक वर्षानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे रशियाच्या दौऱ्यावर होते. पण दौऱ्यावर जाण्यानं मोठ्या संकटाला आमंत्रण दिल्यासारखं झालं आहे.

रशियन सैन्य आता युक्रेनच्या मोठ्या शहरांमध्ये घुसलं आहे. रशिया-युक्रेनमध्ये शांततापूर्ण चर्चा व्हावी यासाठी जागतिक नेते प्रयत्न करत आहेत. पण पुतिन यांनी अगोदर युक्रेनच्या सैन्याला शस्त्रास्त्र खाली ठेवण्याचं आवाहनं केलं आहे.

दरम्यान, इमरान खान यांनी रशिया दौरा केल्यानंतर वाद सुरू झाला असताना अमेरिका आता औद्योगिक निर्बंध लादण्याचा विचार करू शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याची भिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा” 

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?- भगतसिंह कोश्यारी 

रशिया-युक्रेन युद्धावर आठवलेंची कविता, म्हणाले ‘पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून…’