“दारुची दुकानं उघडली तर लॉकडाऊन तोडून रस्त्यावर उतरु”

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनमध्ये दारुची दुकानं उघडण्यास विरोध दर्शवला आहे. दारुची दुकानं उघडली तर लॉकडाऊन तोडून रस्त्यावर उतरु आणि ही दुकानं बंद करु, असा इशारा जलील यांनी दिला आहे.

दारुची दुकानं उघडण्याची ही योग्य वेळ नाही. आपल्या माता-भगिनींना यामुळे त्रास सहन करावा लागेल. जर दुकानं उघडली गेली तर महिलांसह रस्त्यावर उतरु, असं जलील यांनी म्हटलं आहे.

माझ्या मोलकरणीचा नवरा दारुच्या नशेत घरी आल्यावर तिला रोज मारहाण करत असतो. या कठीण काळात दारुविक्री करण्याची इतकी घाई का होत आहे? मग सर्वच दुकानं सुरु का करत नाही?, केवळ दारुच्या दुकानांनाच ही विशेष सूट का?’ असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, जलील यांनी दारुची दुकानं उघडण्याला विरोध केल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे, यामध्ये काही तळीरामांचा समावेश असून जलील आणि त्यांच्याच ट्विटरवॉर रंगलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-फोटो गॅलरी : अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे

-“पुण्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना वाऱ्यावर सोडणार का?”

-“भारतात कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्यात येईल”

-मजुरांच्या घरी जाण्याच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार; सोनिया गांधींची मोठी घोषणा

-…तर मुंबईतून केंद्र सरकारला जाणारा सगळा कर रोखू; शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारला इशारा