राज ठाकरेंना शिंगावर घ्यायला आम्ही घाबरत नाही; इम्तियाज जलीलांचा एल्गार

औरंगाबाद |  जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही. पण सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आगामी प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने असणार आहे, हे स्पष्ट केलं. मशिदीवरचे भोंगे हटलेच पाहिजे, असा पुनरूच्चार देखील राज ठाकरे यांनी केला. यावरूनच एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

राज ठाकरे यांना आत्ताच मशिदीवरचे भोंगे दिसले का?? इतक्या दिवस राज शांत का होते?, असा सवाल जलील यांनी राज यांना केला आहे. तर एमआयएमने अनेकांना शिंगावर घेतलंय… राज ठाकरेंना शिंगावर घ्यायला देखील आम्ही घाबरणार नाही, असा एल्गार जलीलांनी केला आहे.

इतके दिवस तुम्ही राजकारणात आहात? मग मशिदीच्या भोंग्याचा आवाज तुम्हाला आताच ऐकायला आला का? असा झोंबणारा सवाल जलीलांना राज यांना केला आहे. तर याआधीही मी मशिदीच्या भोंग्यावर बोललो असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. त्यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातील मनसैनिकांनी मुंबईकडे धाव घेतली होती. अखेर राज यांनी महाराष्ट्रवासियांना संबोधित करत अनेक मुद्द्यांचा उलगडा केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-रूप बदलणाऱ्या राज ठाकरेंवर काँग्रेसचा पहिला वार!