वंचितमध्ये संघाचे लोक घुसलेत का?- इम्तियाज जलील

औरंगाबाद : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला कधीही 50 जागा मागितल्या नव्हत्या. आमची 76 जागांची मागणी होती. पण वंचितमध्ये काही संघाचे लोक घुसले का? की ज्यांनी आम्हाला एवढ्या जागा देऊ नये असं सांगितलं, असा सवाल एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांचे उपकार कधीही विसरणार नाही. पण मुस्लीम चेहरा म्हणून प्रमोट करायचं आणि नंतर अस्तित्व नाकारायचं हे चालणार नाही. आम्हाला 40 ते 50 जागा दिल्यास आम्ही सोबत जाऊ, असंही जलील यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविरोधात उभी केली होती. त्यांना काँग्रेससोबतच जायचं असेल तर ते अगोदर सांगायला हवं होतं, असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

आमच्याकडे व्होट बँक नाही असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल. पण निवडणुकीत त्यांना दिसेलच, असा इशाराही त्यांनी जलील यांनी दिला आहे.

एमआयएम मंगळवारपासून मुलाखती सुरु करणार आहे. मालेगाव, पुणे, नांदेडसह इतर जागांसाठी मुलाखती होतील, असं जलील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-