भर रेस्टॉरंटमध्ये महिलेने कर्मचाऱ्याच्या अंगावर फेकला पिझ्झा अन् मग…; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | रेस्टॉरंट मधील भांडणाच्या अनेक घटना सतत समोर येत असतात. अनेकदा या भांडणांचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका रेस्टॉरंट मधील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका रेस्टॉरंटमध्ये महिला पिझ्झा हटच्या कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची करत आहे. ती महिला त्या कर्मचाऱ्यावर इतकी चिडते की ती त्याला पिझ्झा फेकून मारते. पिझ्झा हटचा कर्मचारी देखील त्या महिलेवर ओरडतो.

महिला पिझ्झा हटच्या कर्मचाऱ्याच्या अंगावर पिझ्झा फेकत पिझ्झा पुन्हा बनवण्यास सांगते. मात्र तो कर्मचारी तिला साफ नकार देतो. यावेळी ती महिला प्रचंड रागावते आणि जोरजोरात पाय आदळू लागते.

यानंतर कर्मचारी किचनमध्ये पाठीमागे जातो.  महिला देखील त्याच्या पाठिमागे किचनमध्ये जाताना दिसते. यानंतर दुसरा एक कर्मचारी  महिलेला रोखतो. यानंतर महिला इतर कर्मचाऱ्यांसोबत देखील बाचाबाची करते. यावेळी तेथील कर्मचारी तिला पिझ्झा हटच्या कार्पोरेट नंबरवर कॉल करण्यास सांगतात.

ही संपूर्ण घटना तिथल्या एका ग्राहकाने आपल्या मोबाईलमध्ये कै.द करून घेतली आहे. यानंतर हा व्हिडीओ शेड्स ऑफ व्ही या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

नेटकरी यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या महिलेला कर्मचाऱ्याला त्रास देण्यासाठी दोषी मानत आहेत. अद्याप हे भांडण नेमकं कोणत्या कारणाने लागलं होतं, हे स्पष्ट झालं नाही.

दरम्यान, पिझ्झा हटचा कर्मचारी आणि त्या महिलेने दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या महिलेमुळे जळाल्याचे निशाण असल्याचा दावा देखील कर्मचाऱ्याने केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘चित्रपटात काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’; प्रसिद्ध निर्मात्याबद्दल अंकिताचा धक्कादायक खुलासा!

‘माझा दात काढू नका कारण…’; ‘या’ चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

“आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होऊ नये”

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता प्रशासनाने घेतला…

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी…