चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रूग्ण; तिघांचा गेला बळी

नवी दिल्ली | संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. चीनमधून कोरोना फैलासवण्यात सुरूवात झाली. त्याने सगळ्या जगात आता आपले हातपाय पसरले आहेत. चीनमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे असं वात असतानाच आता पुन्हा एकदा 46 कोरोनाचे रूग्ण मिळाले आहेत.

चीनमध्ये आढळलेल्या 46 नव्या रुग्णांपैकी 34 जण असे आहेत की त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. पण त्यांची चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

चीनमध्ये परदेशातून आलेल्या आणि कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची संख्या आता 1183 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 449 जणांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 734 लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी 37 जणांची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, चीनमध्ये आतापर्यंत 81953 कोरोनाचे रूग्ण आहेत. तर त्यातील 77525 रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे. तर दुसरीकडे 3339 जणांना कोरोनाने आपला प्राण गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही पण…

-“अन्नदात्यांच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे समजा त्यांच्याकडून रूम भाडं घेऊ नका”

-लॉकडाउनदरम्यान प्रेमी युगुल घरातून पळालं पण….

-कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडते, आरोग्य मंत्र्यांनी धारावीसारखी पाहणी करावी- राजू पाटील

-“किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”