दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली |  राजधानी नवी दिल्लीसह देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आरोग्य आणि राज्य सरकारं कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. कोरोनाची लढाई आता निकाराची झाली आहे. अशातच दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे, असं मोठं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

दिल्लीमध्ये आतापर्यंत 445 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. एका वेळी ऐकलं तर हा आकडा खूप मोठा वाटतो. मात्र फक्त दिल्लीत एक दुसऱ्याच्या संपर्कात आल्याने केवळ 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसऱ्या केसेस ह्या एकतर मरकजच्या आहेत किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या आहेत. त्यामुळे एक दुसऱ्याच्या संपर्कात येऊन दिल्लीकरांना कोरोनाची लागण झालेली नाही ही माझ्यासाठी समाधानाची बाब असल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत.

पाठीमागच्या एक ते दीड महिन्यांपासून ज्या फ्लाईट्स दिल्लीमध्ये आल्या आहेत त्यातील प्रवाश्यांना दिल्लीमध्ये विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. भारतात आल्याबरोबर त्यांना दिल्लीच्या विविध ठिकाणी क्वारन्टाईन करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होतं, असं केजरीवाल म्हणाले.

एकंदरित मरकज आणि परदेशातून आलेले लोक याव्यतिरिक्त दिल्लीत कोरोनाने आपले हातपाय पसरले नाहीत ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. मात्र या पुढील दिवसांत कोरोनाला आहे त्या परिस्थितीत हरवण्यासाठी दिल्ली सरकार पूर्ण कटिबद्ध आहे, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-दारू तस्करीला वळसे पाटलांचा दणका; 1221 गुन्हे दाखल, 472 जणांना अटक

-कोरोनाविरोधातली लढाई मिळून लढू; मोदी-ट्रम्प यांची फोनवरून चर्चा

-अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत

-विरोधकांच्या टीकेनंतर कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचं महत्वाचं पाऊल!

-धक्कादायक, पुण्यात कोरोनाने घेतले आणखी दोघांचे बळी