आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…

नवी दिल्ली |  देशावर कोरोनाचं संकट आल्यानंतर प्रथमत: देशाला संबोधित करताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. आता त्यानंतर 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता  घरातल्या सगळ्या लाईट बंद करा आणि घराच्या दरावाजासमोर किंवा बाल्कनीत उभा राहून 9 मिनिटे मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅशलाईट जाळा. असा नवा उपक्रम मोदींनी सुचवला आहे. त्यानंतर आता खबरदारी म्हणून केंद्र शासनाने दिवे पेटवताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दिवे लावताना आपण अल्कोहोल मिश्रीत हँड सॅनिटायझर वापरू नका. जर आपण अल्कोहोल मिश्रित हॅन्ड सॅनिटायझर वापराल तर ज्यावेळी आपण दिवे पेटवाल त्यावेळी अल्कोहोल पेट घेण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमचा हातही पेट घेऊ शकतो. म्हणून अल्कोहोल मिश्रीत हँड सॅनिटायझर दिवे लावण्याच्या अगोदर वापरू नका, असा सल्ला सरकारने दिला आहे.

या रविवारी 5 एप्रिल ला रात्री नऊ वाजता.. मला तुमचे नऊ मिनिट हवे आहेत, अशी संदेशाची सुरूवात करत घरातल्या सगळ्या लाईट बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून दरवाजात किंवा बाल्कनीत उभे रहा, असं आवाहन मोदींनी केलं. त्यानुसार आज देशात रात्री 9 वाजता देशवासिय प्रकाशपर्व साजरा करत कोरोनाला पिटाळून लावण्याचा मानस आखतील.

अंध:काराला प्रकाशाची ताकद दाखवत आपण एकटं नाही आहोत हे दाखवून द्यायचं आहे, असं म्हणत मोदींनी देशवासियांना दिवे लावण्याची हाक दिली आहे. देशभरातील भाजप नेत्यांनी या प्रकाशपर्वात सहभागी होण्याची विनंती जनतेला केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे- अरविंद केजरीवाल

-दारू तस्करीला वळसे पाटलांचा दणका; 1221 गुन्हे दाखल, 472 जणांना अटक

-कोरोनाविरोधातली लढाई मिळून लढू; मोदी-ट्रम्प यांची फोनवरून चर्चा

-अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत

-विरोधकांच्या टीकेनंतर कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचं महत्वाचं पाऊल!