अहो, अजितदादा सध्या तुम्हीच मुख्यमंत्री आहात; चंद्रकांत पाटलांची फटकेबाजी

पुणे |  पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या भाषणांदरम्यान चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली. चंद्रकांत पाटील यांनी तर अजित पवारांची स्तुती करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार एक असं राजकीय व्यक्तीमत्व आहे की ते झटपट निर्णयासाठी प्रसिद्ध आहेत. आणि ते सध्या उपमुख्यमंत्री नसून मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांची स्तुती केली तर उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

एक डायनॅमिक राजकीय नेतृत्व म्हणून तुमच्याकडं बघितलं जातं. निर्णय करायला तुम्हाला वेळ लागत नाही. त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी वैगरे बोलावं लागत नाही. सध्या तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असं पाटील म्हणाले.

दुसरीकडे अजित पवार भाषणाला उभे राहिले असता त्यांचा डायस आणि माईक कोलमडला. यावेळी माझ्या भाषणाच्या वेळेस मुद्दाम महापौरांनी हे केलं की काय? असं ते म्हणाले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून भारतात पेट्रोल-डिझेल होणार सहा रुपयांनी स्वस्त…!

-‘काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर सुटका करा’; पवारांचं सरकारला पत्र

-“शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतलाय जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही”

-चिकन खाल्याने कोरोना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे

-10×10 च्या खोलीत बालपण घालवलेल्या नेहा कक्करने खरेदी केला आलिशान बंगला!