नवी दिल्ली | सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या मतभेदांमुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रती लिटर 6 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशांच्या ओपेक संघटनेची उत्पादनाच्या घटकांबाबत एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात एकमत न झाल्याने कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत.
कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार घातलेला आहे. त्याचा परिणाम कच्चा तेलाच्या बाजारपेठांवरही झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे इंधनाची मागणी कमी होईल. त्यामुळे उत्पादन कमी करावं, अशी ओपेकच्या बैठकीत चर्चा सुरु होती. मात्र या मुद्द्याला रशियाची सहमती नव्हती. सौदी अरेबिया आणि रशिया हे कच्चा तेलाची निर्यात करणारे दोन मोठे देश आहेत.
सौदी अरेबिया आणि रशिया दोघांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीवरुन स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. भारतात कच्च्यातेलाची आयातमोठ्या प्रमाणावर होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट करण्याची स्पर्धा झाल्यास भारताला त्याचा फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार विश्लेषक अरुण केजरीवाल यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमतीवरुन स्पर्धा झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलचे दर प्रती लिटर 6 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
-‘काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर सुटका करा’; पवारांचं सरकारला पत्र
-“शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतलाय जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही”
-चिकन खाल्याने कोरोना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे
-10×10 च्या खोलीत बालपण घालवलेल्या नेहा कक्करने खरेदी केला आलिशान बंगला!
-कोरोनामुळे औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला; इम्तियाज जलील यांची मागणी