लसीमुळे तयार झालेली इम्यूनिटी ‘इतक्या’ महिन्यानंतर संपते; अत्यंत महत्वाची माहिती समोर

मुंबई | भारतासह अनेक देशांना या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करावा लागत आहे. पण हा प्रकार सर्व जुन्या प्रकारांच्या तुलनेत सर्वांधिक संक्रामक आहे. अनेकांना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशात घेतल्यानंतर तुमच्या शरीरात निर्माण झालेली इम्यूनिटी (Immunity) किती दिवस टिकते? याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

रिसर्चनुसार सुमारे 30 टक्के म्हणजे दर 10 पैकी 3 लोकांमध्ये, कोरोना लसीचा प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर, त्यांच्याद्वारे तयार केलेली प्रतिकारशक्ती कमकुवत होते किंवा संपते.

भारतात झालेल्या एका संशोधनातून हे तथ्य समोर आले आहे. हे संशोधन एआयजी हॉस्पिटल आणि एशियन हेल्थ केअर, हैदराबाद यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये 1600 हून अधिक लोक सहभागी झाले होते. या सर्व लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

लसीनंतर लोकांना मिळालेल्या प्रतिकारशक्तीचा काय परिणाम होतो हे जाणून घेणे हा या संशोधनाचा उद्देश होता. यासोबतच कोणत्या वयोगटात बूस्टर डोसची जास्त गरज आहे हे शोधून काढले, असं एआयजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नागेश्वरा रेड्डी म्हणालेत.

रोग प्रतिकारशक्तीची पातळी किमान 100 AU प्रति मिली असावी. परंतु, ज्यांची पातळी 15 पर्यंत पोहोचली आहे, त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती संपली आहे असे मानले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

या अभ्यासाअंतर्गत लोकांच्यातील कोरोना विरोधातील अॅन्टीबॉडी तपासण्यात आल्या. त्यानुसार ज्या लोकांमध्ये एन्टीबॉडीचा स्तर 15 AU/ml आहे, त्यांची इम्यूनिटी संपली आहे. ज्या लोकांमध्ये अॅन्टीबॉडीचा स्तर 100 AU/ml आहे, त्यांच्यात इम्यूनिटी अद्यापही असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं. शरीरातील अॅन्टीबॉडीचा स्तर 100 AU/ml असायला हवा. हा स्तर एखाद्या व्यक्तीमध्ये कमी असेल तर तो कोरोना संक्रमित होण्याची शक्यता असते, असं डॉ. रेड्डी यांनी सांगितलं.

दरम्यान, जग आता पूर्वीपेक्षा खूप मजबूत स्थितीत असून कोरोनाच्या या प्रकारांशी लढण्यासाठी सज्ज आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस मिळाली आहे.

लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत डेल्टाच्या तुलनेत कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉन (Omicron) अत्यंत किरकोळ मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

दीर्घकाळ दिसतात कोरोनाची ‘ही’ लक्षणं; वेळीच घ्या डाॅक्टरांचा सल्ला 

उर्फीचा अनोखा अंदाज! नेटकरी म्हणाले, “आधी नशा करणं बंद कर”

 मुख्यध्यापकाच्या ऑफिसमध्ये राडा, बोलता बोलता झालं असं की…; पाहा व्हिडीओ

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…