शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर काही एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल आणि दगडफेक केली होती. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते अडचणीत आले आहेत.

त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील अडचणीत आल्या आहेत. पोलीस दप्तरी जयश्री पाटील यांना वॉन्टेड दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी या प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे केले आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या टॅरेसवर तीन जणांमध्ये मिटींग झाली होती. या मिटींगमध्ये सदावर्ते, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि नागपूरची एक व्यक्ती होती, असा दावा वकिलांनी न्यायालयात केलाय.

जयश्री पाटील यांनीचं हे आंदोलन करण्यास सांगितले होतं, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर अॅड गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शरद पवार यांच्या घरासमोर जे आंदोलन करण्यात आले ते जयश्री पाटील यांच्या सांगण्यावरून करण्यात आले, अशी माहिती पोलीसांच्या हाती लागली आहे. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

7 एप्रिल रोजी रात्री 11 ते 8 एप्रिल पहाटे 2 वाजून 50 मिनिटे या कालावधीमध्ये गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, अभिषेक पाटील आणि कोअर कमिटीतील इतर लोक उपस्थित होते.

सदर मिटींग ही गुणरत्न सदावर्ते राहत असलेल्या क्रिस्टल टॉवरच्या टेरेसवर झाली. याच मिटींगमध्ये जयश्री पाटील यांनी शरद पवार यांच्या घरावर आंदोलन करण्यास सांगितले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

8 एप्रिलला आंदोलन करण्यात आले. त्यावेळेस नागपूरची एक व्यक्ती मुंबईत उपस्थित होती. सगळ्या गोष्टी ही व्यक्ती हँडल करत होती, असा गौप्यस्फोट वकिलांनी केला आहे.

दरम्यान, या व्यक्तीने महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर उतरून समुहाने सिल्वर ओक जवळील मैदानात हजर व्हा, असे संदेश दिले होते. मैदानात जमल्याचे अभिषेक पाटीलने सांगितल्यावर नागपूरच्या व्यक्तीने माध्यमांना कळविले, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 
काय सांगता! रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार?

“संजय राऊत म्हणजे राष्ट्रवादीचा भोंगा, उद्धव ठाकरेंनी कधीच…”

नवाब मलिकांना धक्क्यावर धक्के! अटकेनंतर आता ईडीने मोठी कारवाई केली

“उद्धव ठाकरेंना भेटलो…”, शिवसेना-वंचित युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत खळबळजनक माहिती समोर!