बेपत्ता ‘सोमय्या’ मुंबईत दाखल; कोर्टाकडून दिलासा मिळताच शिवसेनेवर बरसले

मुंबई | आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता होती.

अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे.

अटकेपासून संरक्षण देत असतानाच पोलिसांच्या चौकशीला हजर राहण्याच्या सुचना देखील सोमय्यांनी दिल्या आहेत. न्यायालयाकडून दिलासा मिळताच सोमय्या मुंबईत दाखल झाले आणि माध्यमांना सामोरे गेले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. फक्त दिलासाच नाही तर त्यांनी जे प्रश्नचिन्ह निर्माण केलेत, तोच प्रश्न मी मागील आठ दिवसांपासून उद्धव ठाकरेंना विचारतोय, असं सोमय्या म्हणाले आहेत.

सीएमओचं काम फक्त माफियागिरी पोलिसांना करायला लावायची. तर खोटा एफआयआर नोंदवायचा, अटक करून तुरुंगात टाकायची अशी भाषा वापरायची एवढंच असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.

विक्रांतमध्ये एक दमडीचा घोटाळा आम्ही केलेला नाही. संजय राऊतांनी 58 कोटींची भाषा वापरली होती आणि आठही आरोप पैकी एकाचाही कागद नाही आणि त्याचा पुरावा नाही, असंही सोमय्या म्हणाले आहेत.

मागील चार, पाच दिवस नाटक सुरू होतं. ते नाटक उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं आणि संजय राऊत प्रवक्ता आहेत. मात्र, खरे मास्टरमाईंड उद्धव ठाकरे आहेत, अशी टीका सोमय्यांनी केली आहे.

दरम्यान, न्यायालयावर माझा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीला मी हजर राहणार असल्याची माहिती देखील सोमय्यांनी यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

काय सांगता! रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार?

“संजय राऊत म्हणजे राष्ट्रवादीचा भोंगा, उद्धव ठाकरेंनी कधीच…”

नवाब मलिकांना धक्क्यावर धक्के! अटकेनंतर आता ईडीने मोठी कारवाई केली

“उद्धव ठाकरेंना भेटलो…”, शिवसेना-वंचित युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य