‘लस घेतलेल्या 90 टक्के भारतीयांना….’; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

मुंबई | ओमिक्रॉनचं (Omicron) संकट आता हळूहळू वाढत असल्याचं दिसतंय. देशातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 151 वर पोहोचली आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढू वाढली आहे. अशात संशोधनातून आलेल्या माहितीने सर्वांची झोप उडाली आहे.

भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना देखील Omicron च्या संसर्गाचा धोका आहे, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. यामुळे सर्वांचं टेंशन वाढलं आहे.

ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीच्या क्षमतेवर हा अभ्यास ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे आणि त्यानुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. मात्र, यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल. या दोन्ही लसी जगातील बहुतांश देशांमध्ये उपलब्ध नाहीत.

भारताच्या संदर्भात अभ्यासाविषयी बोलताना असं म्हटलं आहे की, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीनं सहा महिन्यांच्या लसीकरणानंतर ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याची कोणतीही क्षमता दर्शविली नाही.

भारतात, लसीकरण केलेल्या 90 टक्के लोकांना AstraZeneca लस Covishield या ब्रँड नावाखाली मिळाली आहे. या लसीचे 65 दशलक्षाहून अधिक डोस 44 आफ्रिकन देशांमध्ये वितरित केले गेले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. त्यानंतर आता हळू हळू रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ओमिक्रॉनचे सहा नवीन रुग्ण आढळून आले असून या रुग्णांची संख्या 54 झाली आहे. सहा रुग्णांपैकी एक रुग्ण मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि पिंपरी चिचवडचा आहे.

दरम्यान, एकीकडे ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. नवी दिल्लीत तब्बल सहा महिन्यानंतर 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण एका दिवशी आढळून आले आहेत. रविवारी दिल्लीत 107 रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलं आहे. नवी दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 540 वर पोहोचली आहे. यामधील 255 रुग्ण होम आयसोलेशेनमध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पॉर्नोग्राफी निर्मितीबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…

“2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली” 

“राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, तरी फडणवीसांना सांगितलं होतं यांना पक्षात घेऊ नका” 

कोरोनामुळे शरीरावर होतायेत गंभीर परिणाम; धक्कादायक माहिती समोर 

“नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही”