पॉर्नोग्राफी निर्मितीबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…

मुंबई | अश्लील चित्रपट निर्मितीबाबत राज कुंद्रा यांनी मौन बाळगलं होतं. आता या प्रकरणावर राज कुंद्राने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. या प्रकरणी माझा काहीही संबंध नसून आयुष्यात कधीही आपण पॉर्नोग्राफी निर्मितीत सहभागी झालो नसल्याचं राज कुंद्राने स्पष्ट केलं आहे.

घडलेला सर्व प्रकार मला बदनाम करण्याचा एक कट होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी यावर अधिक बोलू इच्छित नाहीये. संबंधित खटल्यातील सुनावणीला मी सामोरं जाणार असून याठिकाणी मला न्याय मिळेल, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे, असं राज कुंद्राने म्हटलं आहे.

न्यायालयात सत्याचा विजय होईल. पण दुर्दैवाची बाब म्हणजे माध्यमांनी आणि माझ्या कुटुंबाने मला आधीच दोषी ठरवलं आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून मला विविध प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागत आहे, असं त्याने सांगितलं आहे.

माझं कुटुंब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. मला विश्वास आहे की, घटनेनं प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे माझा हा अधिकार अबाधित राहावा अशी इच्छा आहे, असंही राज कुंद्रा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

विविध स्तरावर माझ्या मानवी आणि घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन केलं जात आहे. ट्रोलिंग आणि नकारात्मकता पसरवून माझ्याबद्दल समाजात द्वेष पसरवला जात आहे. पण येथून पुढे माध्यमांकडून सुरू असलेलं मीडिया ट्रायल बंद करावं. आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होऊ नये, अशी आशा आहे, असं राज कुंद्राने म्हटलं आहे.

दरम्यान, पॉर्न फिल्म तयार करणं आणि त्याचं वितरण केल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राजला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडूनही राजला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी राजला चार आठवडे अटक करू नका अशा सूचना दिल्या आहेत. या सूचनेबरोबरच सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ही नोटीस पाठवल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली” 

“राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, तरी फडणवीसांना सांगितलं होतं यांना पक्षात घेऊ नका” 

कोरोनामुळे शरीरावर होतायेत गंभीर परिणाम; धक्कादायक माहिती समोर 

“नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही” 

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा”