कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळू हळू कमी होऊ लागली होती. राज्य सरकारनं अनेक गोष्टीवरील निर्बंध शिथील केले होते. नागरिकांकडून कोविड सुसुंगत वर्तन होत नसल्याचं अनेकदा दिसून आलं होतं.

गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या वाढू लागली होती. मंगळवारी राज्यात 2172 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 22 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येनं 2 हजारंचा टप्पा ओलांडला आहे. तब्बल 75 दिवसानंतर रुग्णसंख्येनं 2172 रुग्णसंख्येची नोंद झाली. वाढती रुग्णसंख्या ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतदेखील मुंबई आणि परिसरात सर्वाधिक केसेसची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता ओमिक्रॉन व्हायरसच्या सर्वाधिक केसेसही मुंबईतच आढळून येत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

दरम्यान, देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 653 वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात 167, दिल्ली 165, केरळ 57 आणि गुजरातमध्ये 54 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील 91 बाधित बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत नोंदवली गेली आहे.

मुंबई 84, पिंपरी चिंचवड 19, पुणे जिल्हा 17, पुणे महापालिका 7, ठाणे महापालिका 7 , सातारा 5, उस्मानाबाद 5 आणि पनवेल महापालिका क्षेत्रात 5 रुग्णांची नोंद झाली.

कल्याण डोंबिवली, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर, बुलडाणा, लातूर, अकोला, अहमदनगर, वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पालघर, भिवंडीमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झालीये.

महत्त्वाच्या बातम्या – 

टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ 

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली