“पंतप्रधानांनीच अशा चुका केल्या तर त्यांना कोणता बूस्टर डोसही वाचवू शकत नाही”

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढायला सुरूवात केली. 14 राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने सगळीकडे भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बूस्टर डोस गरजेचा असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. त्यात देशात अनेक ठिकाणी ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण सापडत असल्याने केंद्र सरकारदेखील सतर्क झालं आहे.

केंद्राकडून सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचं कठोर पालन करा शिवाय गरज पडली तर निर्बंध लावा अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका बघता अनेक राज्यांनी पुन्हा निर्बंध लावायला सुरूवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना देत असतात. पण नरेंद्र मोदीच अनेक वेळा विनामास्क आढळल्याने विरोधक त्यांच्यावर कडाडून टीका करतात.

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी विनामास्क दिसत आहेत.

नुसती टीका करायची म्हणून नाही पण जर पंतप्रधानांनीच सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नाही तर सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल?, असा सवाल संजय निरूपम यांनी उपस्थित केला आहे.

‘जर पंतप्रधानांनीही अशा चुका केल्या तर त्यांना कोणता बूस्टर डोसही वाचवू शकत नाही’, अशी घणाघाती टीका संजय निरूपम यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

आमच्याकडूनही चुका होत आहेत पण आम्ही तो सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही संजय निरूपम म्हणाले. पण पंतप्रधानांनीही अशा चुका केल्या तर कसं होणार? म्हणत संजय निरूपम यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, संजय निरूपम यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये फक्त नरेंद्र मोदी यांनीच मास्क लावलेला नाही. फोटोत दिसणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग देखील मास्कमध्ये दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

इंटरनेटची स्पीड 10 पट वाढणार; लवकरच येणार 5G इंटरनेट सेवा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सलमानच्या वाढदिवसाला जेनेलियाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ