मुंबई | आरोग्य मंत्रालया (Health Ministry)ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत केरळमध्ये कोरोनाचे 847 नवीन रुग्ण आढळले.
येथील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 65,25,879 झाली आहे. याशिवाय महाराष्ट्रात 171 आणि आंध्र प्रदेशात 75 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात नवीन 171 रुग्णांची भर पडल्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 78,72,203 झाली आहे.
काही राज्यांत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दैनंदिन आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना संपला असा समज करून बेफिकीर वागता कामा नये, असा सतर्कतेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
राज्याचा मृत्यूदर नियंत्रणात आल्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 1,43,765 वर गेला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,680 आहे. शुक्रवारी 394 लोक कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 77,22,754 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 75 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 23,19,141 वर गेली आहे. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
मोदी सरकारचा सर्व राज्यांना अलर्ट, म्हणाले…
‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
“भाजपचा शिमगा रोज सुरूये, आम्ही शिमगा सुरू केला तर…”
“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”
“आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही”