मुंबई | पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. तुम्ही पक्षाची स्थापना केल्यापासून पक्षाचा नेता मुख्यमंत्री करता आला नाही, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केली आहे. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगतात की महाविकास आघाडी पुढचे 25 वर्ष सत्तेत येईल. पण, त्यांनी लक्ष्यात घ्यावं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत, असं पडळकरांनी सांगितलं.
सध्या चार राज्यात भाजपने सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपण काय करतो याचा विचार करावा भाजपच्या आमदारांचा करू नये, असा टोला देखील पडळकर यांनी लगावलाय.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येईल असं शरद पवार आणि त्याचे नेते करत आहेत. पण, त्यांनी भाजपच्या आमदारांचा विचार करू नये, असं पडऴकर म्हणाले.
कुणाच्या पाटीत खंजीर खुपसल्यावर आपण सत्तेत येईल याचा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करावा, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
आम्ही पुढील 25 वर्षे सत्तेत राहणार असं ते म्हणतात. मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले. तर, शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. तुम्ही पक्षाची स्थापना केल्यापासून पक्षाचा नेता मुख्यमंत्री करता आला नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनाने पुन्हा टेंशन वाढवलं; गेल्या 24 तासातील रूग्णांची आकडेवारी समोर
मोदी सरकारचा सर्व राज्यांना अलर्ट, म्हणाले…
‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
“भाजपचा शिमगा रोज सुरूये, आम्ही शिमगा सुरू केला तर…”
“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”