भारतासाठी गुड न्यूज; कोरोनाबाबत ही महत्वाची माहिती समोर

मुंबई | भारतातील (coronavirus in India) कोरोना व्हायरसची (Coronavirus) स्थितीत आता सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, मृतांच्या संख्येने तणाव वाढला आहे. काल देशभरातून कोविड-19 च्या 2.35 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 871 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण त्यात दिलासा देणारी बाब आहे की, शनिवारी देशभरातून नोंदवलेले प्रकरण शुक्रवारच्या तुलनेत 6 टक्के कमी आहेत. सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचं झालं तर देशातील कोविडच्या सक्रिय रूग्णांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 4.91 टक्के वाटा आहे.

केरळमध्ये (Kerala) शनिवारी कोरोना संसर्गाचे 50, 812 नवीन रुग्ण आढळले. तर गेल्या 24 तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3,36,202 सक्रिय प्रकरणे आहेत. कर्नाटकमध्ये कोविड-19 चे 33 हजार 337 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 70 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात 2 लाख 52 हजार 132 सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी, तामिळनाडूमध्ये कोविड -19 चे 24,418 रुग्ण आढळले, ज्यामध्ये चार रुग्ण परदेशातून परतले होते. गेल्या 24 तासांत येथे संसर्गामुळे 46 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 2,08,350 सक्रिय रुग्ण आहेत.

मध्य प्रदेशात कोविडचे 8,678 नवीन रुग्ण आढळल्याने, संक्रमित लोकांची संख्या 9,50,134 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोविडमुळे पाच रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाप्रकारे राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 10,607 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचे 11974 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 11,44,585 झाली आहे. तर 33 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 10,408 वर पोहोचली आहे.

दुसरीकडे, शनिवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 27,971 नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी 85 ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आहेत. यासोबतच आणखी 61 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण बाधितांची संख्या 76,83,525 वर पोहोचली आहे, तर आणखी 61 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,42,522 वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘भिकार सीरियल पाहणं बंद करा’; विक्रम गोखले भडकले 

राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

“शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याचीही परवानगी देऊन टाका”

“मला सचिन तेंडूलकरची दया येते, त्याकाळी…”, रावडपिंडी एक्सप्रेसचं मोठं वक्तव्य 

 भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध??? धक्कादायक वृत्त समोर