लग्नाआधीच लिव्ह इनमध्ये, वाचा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेत्रीची लव्हस्टोरी

मुंबई | फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. हा महिना तरूणांसाठी काही खास असतो. फेब्रुवारीतील व्हॅलेंटाईन आठवडात अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल होतात.

काहींच्या प्रेम मिळतं. तर काहींना मिळत नाही. परंतु या प्रेमाच्या कहाण्या मनाच्या हळव्या कोपऱ्याचा भाग बनून जातात. अशीच एक प्रेम कहाणी सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको यात राधिकाची भूमिका साकारणारी अनिता दाते सध्या चर्चेत आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने तिने सर्वांनात भूरळ घातली आहे.

अनिता दाते जशी छोट्या पद्यावर दिसते, त्यापेक्षा खूप वेगळं तिचं आयुष्य आहे. अनिता दाते रिअल लाइफमध्ये मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.

अनिता दाते हिच्या नवऱ्याचं नाव चिन्मय केळकर आहे. तो सुद्धा अभिनत्र क्षेत्रात काम करत आहे. अशातच आता अनिता दाते आणि चिन्मय केळकर यांची लव्ह स्टोरी समोर आली होती.

अनिताला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. अखेरपर्यंत तिने आपली कला जपली. काँलेजमध्ये अनिता आणि चिन्मय यांची भेट एका नाटकाच्यावेळी झाली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकांनी जाणून घेतलं आणि प्रेमात पडले.

त्यावेळी चिन्मयला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे दोघांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये रहायचा निर्णय घेतला. तब्बल दीड वर्ष दोघं लिव्ह इनमध्ये रहायचे. मात्र, काही काळानंतर दोघांनी निर्णय बदलला.

दोघांनी लग्न केलं आणि आता त्यांच्या लग्नाला 11 वर्ष पुर्ण झाली आहेत. लिव्ह इनमध्ये जेवढं प्रेम ते एकमेकांवर लावायचे, तितकंच प्रेम आतासुद्धा करतात, असं अनिता सांगते.

महत्त्वाच्या बातम्या – 

जिओ, आयडिया, एअरटेल सगळ्यांची सुट्टी होणार?, BSNLनं आणली धमाकेदार ॲाफर

मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल

 ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा

मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ