जिओ, आयडिया, एअरटेल सगळ्यांची सुट्टी होणार?, BSNLनं आणली धमाकेदार ॲाफर

मुंबई | जिओने टेलिकाॅम क्षेत्रात पाऊल ठेवताच टेलिकाॅम क्षेत्रात मोठे बदल झाले. सुरूवातीला फुकट इंटरनेट देऊन जिओने प्रतिस्पर्धी कंपन्यांना नकोसं केलं. आता जिओचा सध्या मोठ्या प्रमाणावर दबदबा पहायला मिळतो.

जिओ कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणत असते. जिओच्या स्वस्त आणि मस्त ऑफर्समुळे देशभरातील मोबाईल युजर्स जिओच्या सीमकार्डला प्रथम पसंती दर्शवतात. मात्र, आता जिओची नाही तर बीएसएनएलची सर्वत्र चर्चा होत आहे.

बीएसएनएल इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत आहे. ही स्पर्धा इतकी वाढली आहे की, कंपनीचा नवा रिचार्ज प्लान अवघ्या 666 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला आहे.

आयडीया, जिओ, एअरटेल यांसारख्या कंपन्यांचं आता अवघड झाल्याचं पहायला मिळत आहे. कंपनीने आपल्या राजस्थान ट्विटर हँडलवरून ट्विट करून या प्लॅनची ​​माहिती दिली आहे.

बीएसएनएल सेल्फ केअर अँप व्यतिरिक्त, तुम्ही हा प्लान बीएसएनएल रिचार्ज पोर्टलवरूनही रिचार्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळणार आहे.

याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला 110 दिवसांची वैधता मिळते. त्यानंतर तुम्हाला मिळणारा डेटा जवळपास 220 GB होईल. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला भरपूर डेटा मिळतो.

याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची ऑफर दिली जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत.

दरम्यान, तुम्हाला झिंग म्युझिक सब्सक्रिप्शन आणि हार्डी गेम म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल

 ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा

मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल