पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी

चंदीगड | पंजाबमध्ये जोरदार राजकीय राडा झाल्याचं समोर येतं आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिख तरूण एकमेकांना भिडले आहेत. जोरदार मारमारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पटियाला येथे काही शिख तरूणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खलिस्तान मुर्दाबादच्या विरोधात मोर्चा काढला आणि घोषणा दिल्या परिणामी वातावरण बिघडलं होतं.

काली माता परिसरात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानं मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलं होतं. एसएचओ जखमी देखील झाल्याची माहिती मिळाली आहे.

हिंदू नेता आणि त्रिपदीचे एसएचओ हे जखमी झाले आहेत. परिणामी त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आहे. खालिस्तानी समर्थकांनी एसएचओवर तलवारीनं हल्ला केला.

एसएचओवरील हल्ला परतवून लावताना सुरक्षा रक्षकांनी 15 राऊंड गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या भागात अजून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे पंजाब कार्याध्यक्ष हरीश सिंग यांनी खालिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत मोर्चा काढला. परिणामी काही नागरिकांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

शीख फाॅर जस्टीसचे निमंत्रक गुरपतवंत पन्नू यांनी 29 तारखेला खालिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याचं ठरवल्यानं आम्ही विरोध करण्यासाठी मोर्चा काढल्याचं हरीश सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या गोंधळानंतर काली देवी मंदिर भक्तासांठी बंद करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला 

“…मग केंद्र सरकार काय फक्त घंटा वाजवायला बसलंय का?”