रायगड | कुणी कुठेही जाऊ द्या रायगडमध्ये यापूर्वीही राष्ट्रवादी 1 नंबरला होती आणि इथून पुढेही रायगडमध्ये राष्ट्रवादी नंबर 1 च राहणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
तटकरेंचे पुतणे आणि श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी पवारांची साथ सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणी कुठेही जाऊ द्या म्हणत तटकरेंनी अवधूत यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत तटकरे बोलत होते.
संपूर्ण भारतात मोदी लाट असताना देखील एक तळागाळातील कार्यकर्ता म्हणून मला चांगले यश मिळाले. तुमच्यामुळे हे सर्व घडू शकले, असं ते म्हणाले.
दरम्यान, माझ्याही बाबतीत पक्षांतराच्या अफवा पसरवल्या गेल्या. मात्र पक्षाध्यक्षांनी आणि मी त्या अफवांना पूर्णविराम दिला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या-
‘…अन् शिवच्या राणीने घेतली शिवच्या जिजाऊंची भेट!’ https://t.co/I3KTi3RmbE @ShivThakare9 @officialveenie
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 8, 2019
येत्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही- विखे पाटीलhttps://t.co/RrhcN55g7f@bb_thorat @RVikhePatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 8, 2019
प्रदेशाध्यक्षांवरच काँग्रेस सोडायची वेळ तर येणार नाही ना??- राधाकृष्ण विखे https://t.co/vQclzYEdAu @RVikhePatil @bb_thorat
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 8, 2019