Top news मनोरंजन

अखेर नेहा कक्करचं ठरलं; या व्यक्तीसोबत लग्न करणार?

मुंबई | बॉलीवूड सिंगर नेहा कक्कर नेहमीच व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहलीच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र, काही कारणानं दोघांचं ब्रेक अप झालं आणि नेहा दुःखात बुडाली होती. आता पुन्हा एकदा नेहाच्या प्रेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

नेहा कक्कर तिचा मित्र आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंह बरोबर लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार नेहा येत्या 24 ऑक्टोबरला रोहनप्रीत बरोबर लग्न करणार आहे. मात्र, अद्याप या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. यामुळे नेहा खरच रोहनप्रीत बरोबर लग्न करणार का?, हे येणारा काळच सांगेल.

काही दिवसांपूर्वी रोहनप्रीतनं एक म्युझिक व्हिडीओ बनवला होता. यामध्ये नेहा रोहनप्रीतला डायमंड रिंग मागत लॉकडाऊनच्या काळात लग्न करण्यास सांगत आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या या गाण्याला सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलं जात असून त्यांच्या लग्नाची ही हिंट समजली जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात नेहा आणि रोहनप्रीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, रोहनप्रीतच्या मॅनेजरनं हे सूत्र नाकारलं आहे. रोहनप्रीतचा सध्या लग्न करण्याचा कसलाच विचार नाही, असं रोहनप्रीतच्या मॅनेजरनं म्हटलं आहे.

रोहनप्रीत सिंह हा एक पंजाबी गायक असून याने आत्तापर्यंत अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. 2007 मध्ये रोहानप्रीतनं ‘सारेगमप लिटील चॅम्पस’मध्ये भाग घेतला होता. या शोचा तो प्रथम रनर अप ठरला होता. तसेच रोहनप्रीतनं 2018 मध्ये ‘राइज‍िंग स्टार 2’मध्येही भाग घेतला होता. इथेही आपल्या आवाजाची जादू चालवत तो प्रथम रनर अप ठरला होता.

2017 मध्ये रोहननं आपलं पाहिलं गाण ‘गैंग बैंग’ रिलीज केलं होतं. यानंतर तकलीफ, हैलो हाय, पहली मुलाकात यांसारखी अनेक गाणी रोहननं गायली आहेत.

रोहनप्रीत सिंह यावर्षी रिअॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्ये सुद्धा दिसला होता. या शोमध्ये तो शहनाज गिलला समजवण्यासाठी आला होता. मात्र, हा शो जास्त चालू न शकल्यानं या शोचं शूटिंग थांबण्यात आलं होतं.

दरम्यान, नेहा कक्कर आणि गायक आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. एवढंच नाही तर इंडिअन आयडलच्या सेटवर या दोघांच्या लग्नाचा ढोल देखील वाजवला गेला होता. मात्र,  नेहा कक्कर आदित्य नारायण सोबत नाही तर रोहनप्रीत सिंह बरोबर लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“सुशांतला धमकावत त्याच्यावर बला.त्काराचे आरोप केले जात होते”

पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; का लावत आहेत लोक एवढी बोली?

‘टॉप’वर पोहचण्यासाठी अनेक हिरोईननी केलं ‘हे’ काम; ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा

रतन टाटांच्या टाटा मोटर्सला भारतीयांची साथ, सप्टेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत वाढ…!

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक सामूहिक ब.लात्कार; भाजप नेत्याला ठोकल्या बेड्या!