ओमिक्राॅनमुळे ‘या’ लोकांचा होतोय मृत्यू, ICMRच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मुंबई | मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पाच आठवड्यापूर्वी ओमिक्राॅन व्हेरिंयटने देशभर धुमाकूळ घातला होता.

अशातच आता ओमिक्राॅनचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतायेत. कोरोनापासून बचावासाठी देशभर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं होतं. मात्र, अद्याप काही लोकांनी लसीकरण पुर्ण केलेलं नाही.

अशातच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR च्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ओमिक्राॅनबाधित प्रत्येक 10 पैकी 9 लोक असे होते ज्यांनी लस घेतली नाही. त्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अहवालातून मिळाली आहे.

कदाचित त्यामुळेच तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी प्राणघातक नव्हती, अशी माहिती देखील आयसीएमआरने दिली आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका जास्त असतो, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग झालेल्यांचा मृत्यू दर 10 टक्के होता. तर लस न घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 22 टक्के होते, असं ICMR चे DG डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे.

या लाटेत पूर्वीच्या लाटेपेक्षा तरुणांना जास्त लागण झाली आहे. यात बाधितांचे सरासरी वय 44 वर्षे असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, तातडीने कोल्हापूरला हलवलं

“एक हजार पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढून शकत नाही”

शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांना ऊर्मिला मार्तोंडकरने सुनावलं, मोदींचा ‘तो’ फोटो केला शेअर 

दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी; सुप्रिया-शरद पवारांचा हा फोटो ‘का’ होतोय व्हायरल? 

लता मंगेशकरांना विष देऊन मारायचा प्रयत्न झालेला?, नेमका काय प्रकार घडला होता?