“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”

मुंबई | सध्या सर्वत्र नवीन वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. नवीन वर्षात नवीन काहीतरी करण्याचा संकल्प प्रत्येकजण करत असतो. राजकीय नेतेही याला अपवाद ठरत नाहीत.

राजकीय नेते प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधतात असं म्हटलं जातं. नवीन वर्षात आपल्या राजकारणाचा अधिकाधिक फायदा हा जनतेला व्हायला पाहिजे असं राजकीय नेते म्हणत असतात.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे आणि भाजप विरोधात आहे. महाविकास आघाडी सरकार 2019 साली ऐतिहासिक राजकीय घडामोडीनंतर सत्तेत आली.

सत्ता स्थापनेपासून अनकेदा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत वक्त्व्य केल्याचं महाराष्ट्रानं पाहीलं आहे,

भाजपचे मित्रपक्ष रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या खास शैलीसाठी राज्याच्य राजकारणात प्रसिद्ध आहेत.

कोरोगाव भिमा येथील विजस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरोगावला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी रामदास आठवले यांनी मानवंदना दिल्यानंतर पत्रकार परिषदेला उत्तर दिली आहेत.

नवीन वर्षात काय संकल्प केला आहे असा प्रश्न विचारल्यावर रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केला आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानं राज्यात खळबळ माजली आहे. महाविकास आघाडी सरकार घालवण्यासोबतच आपला पक्ष मजबूत करणार असल्याचं आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, रामदास आठवले यांच्या वक्तव्यांनतर आता महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर  जोरदार टीका करण्यात येत आहे. परिणामी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकार आणि विरोधकांमध्ये कलगीतूरा पेटणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”

‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती

गुड न्यूज! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त