…अन् पडत्या पावसात रावसाहेब दानवे वारकऱ्यांसाठी झाले चहावाले

सोलापूर | कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आज तब्ब्ल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त आषाढी एकादशी साजरी करण्यात येत आहे. अवघी पंढरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली असून 12 लाखांहूनही जास्त भाविक आज पंढरीत दाखल झाले आहेत.

अनेक पालख्या आज पंढरीत दाखल झाल्या. तर हजारो वारकरी चंद्रभागेत स्नान करून पांडुरगाच्या दर्शनासाठी आतूर झाले आहेत.

अनेक भाविकांच्या गर्दीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी देखील पंढरपूर गाठलं आहे. यावेळी थकलेल्या वारकऱ्यांसाठी रावसाहेब दानवे पडत्या पावसात चहावाले झाले आहेत.

वारकऱ्यांसाठी रस्त्याच्या कडेला अनेक हॉटेलची सोय करण्यात आली आहे. त्यात पंढरपूर तालुक्यातील सुभाष वाघ यांचं फिरतं हॉटेल देखील पंढरपुरात लागलं आहे.

यावेळी रावसाहेब दानवेंनी वाघ यांच्या हॉटेलमध्ये चहा बनवून वारकऱ्यांना पाजण्याचं पुण्याचं काम केलं आहे. पडत्या पावसात वारकऱ्यांना गरमा गरम चहा देत असतानाचा दानवेंचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दिंडीत पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना गरमा गरम चहा देण्याचं काम रावसाहेब दानवेंनी केलं. तर सोबतच या वाकऱ्यांची विचारपूस देखील केली.

दरम्यान, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तर यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाई नवले यांना महापूजेचा मान मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीबद्दल एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण

‘रूप पालटून फिरण्याचे शौकीन पंतप्रधान मोदी, पण आता फडणवीसही तेच करू लागलेत’; शिवसेनेचा टोला

बायकोशी खोटं बोलून मैत्रिणीला भेटायला नवरा गेला मालदीवला, पुढे असं काही घडलं की…

भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडलं लाखोंचं घबाड, राजकीय वर्तुळात खळबळ

“अमृता फडणवीसांनीच घरातलं गुपित फोडलं, नाहीतर या महान कलावंताची ओळख झालीच नसती”