एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना लवकरच भेटणार?, शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे खळबळ

सोलापूर | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंची बंडाळी ते महाराष्ट्रातील सत्तांतर अशा अनेक घडामोडी राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाल्या.

समर्थक आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीनंतर आता शिंदे गट विरूद्ध शिवसेना असं शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. यानंतर पंढरपूरनगरीत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? या प्रश्नावर देखील शिंदेंनी सूचक उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर एकनाथ शिंदेंनी लवकरच असं उत्तर दिलं.

शिंदे गटानं विश्वासघात केल्याचा शिवसेनेचा आरोप देखील एकनाथ शिंदेंनी फेटाळून लावला आहे. तर संजय राऊत आमच्याविरोधात करत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

आम्ही अनेकदा उद्धव ठाकरेंकडे गेलो मात्र भाजपसोबत जाण्यासाठी आम्ही त्यांचं मन वळवू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. राजकीय समीकरण बदलल्याने आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिंदे गटातील 16 आमदारांना सेनेने पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटीसीवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘रूप पालटून फिरण्याचे शौकीन पंतप्रधान मोदी, पण आता फडणवीसही तेच करू लागलेत’; शिवसेनेचा टोला

बायकोशी खोटं बोलून मैत्रिणीला भेटायला नवरा गेला मालदीवला, पुढे असं काही घडलं की…

भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडलं लाखोंचं घबाड, राजकीय वर्तुळात खळबळ

“अमृता फडणवीसांनीच घरातलं गुपित फोडलं, नाहीतर या महान कलावंताची ओळख झालीच नसती”

चार पिढ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न