भर रस्त्यात ‘हा’ तरुण पोलिसांना शिवीगाळ करत आला अंगावर अन् मग…; पाहा व्हिडीओ

मुलुंड | आज सकाळपासून सोशल मीडियावर मुलुंड मधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुण मुंबई पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून या तरुणाबद्दल अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

माहितीनुसार, नेहमीप्रमाणे आज सकाळी मुलुंड वाहतूक पोलीस आर आर टी रोडवर आपलं काम बजावत होते. यावेळी पोलीस नो पार्किंगमध्यें उभ्या असणाऱ्या गाड्यांवर कारवाई करत होते. यावेळी जतीन सतरा नावाच्या युवकाच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या त्याच्या बाईकवर देखील पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी कारवाई करताच जतीन प्रचंड संतापला. संतापलेल्या जतीनने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप या दोघांना जतीनने भर रस्त्यात अर्वाच्च भाषा वापरत शिवीगाळ केली.

जतीन यावेळी दोघांच्याही अंगावर धावून गेला. तसेच तो वाहतूक पोलिसांना धमक्या देखील देऊ लागला. यावेळी पोलिसांनी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. यानंतर वाहतूक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

मुलुंड पोलिसांनी देखील तातडीने कारवाई करत जतीनला ताब्यात घेतलं. मुलुंड पोलीस ठाण्यात जतीन विरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी जतीनला ताब्यात घेताच तो नरमला. त्याने पोलिसांची जाहीर माफी मागितली.

जतीनने जाहीर माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ मी मुलुंडकर या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. पोलिसांची जाहीर माफी मागताना जतीन म्हणाला की, मी जतीन प्रेमजी सतरा. मुलुंडचा रहिवासी.

आर आर टी रोडवर वाहतूक पोलिसांसोबत मी जे गौरवर्तन केलं त्याबद्दल मी माफी मागतो. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या मुंबई पोलिसांना मी सलाम करतो. ज्यांना वाईट वाटलं त्यांची मी मनापासून माफी मागतो, असं जतीनने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मुंबईतील ‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन!

‘या’ कारणामुळे अभिनेता अमिताभ बच्चन यांनी डावा हात खिशात घालून केलं होतं ‘शराबी’चं शुटिंग, वाचा काय होतं कारण

अभिनेत्री प्रियंका चोप्रा विमानात पिली होती दारु अन्…,…

शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय…

‘तुला बाॅयफ्रेंड आहे का?’ असं विचारणाऱ्या…