“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”

मुंबई | बाबरी मशिदीवरील ढाचा पाडण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये वारंवार उल्लेख केला होता. त्यावरून मुंबईतील बुस्टर डोस सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

बाबरी ही मशीद नव्हती. मात्र, परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता. तो पाडला त्यावेळी मी स्वत: तिथे होतो, हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्यासाठी तिथे होता, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं.

हे सांगतात बाबरी मशीद आम्ही पाडली. मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले की, यांची हातभर फाटली, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवरून आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर  1857 च्या उठावामध्ये देखील फडणवीसांचे योगदान असेल, असा जोरदार टोला आदित्य ठाकरेंना लगावला होता.

आदित्य ठाकरेंच्या टीकेवरून आता देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना चिमटे काढले आहेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना कधीही संघर्ष करावा लागला नाही.

त्यामुळे मर्सिडीज बेबीला संघर्ष काय कळणार ?, असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यांनी संघर्ष पाहिलेला नाही. यामुळे ते कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्हाला आमच्यासारख्या हजारो, लाखो कारसेवकांच्या कृतीचा गर्व आहे. मागील जन्मावरही विश्वास आहे आणि पुढील जन्मावरही विश्वास आहे.

कदाचित मागच्या जन्मात मी असेन तर 1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढलो असेल. तुम्ही जर असाल तर इंग्रजांशी युती केली असेल. कारण तुम्ही अशा लोकांसोबत युती केली की, जे 1857 चे युद्ध मानत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

अडीच वर्षे तुम्ही काय केलं? पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

“भोंगेंबाज राजकारण्यांनी आज हिंदूत्त्वाचा सुद्धा गळा घोटला”

मोठी बातमी! ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका

 जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत….- राज ठाकरे

संदीप देशपांडेंनी पोलिसांना चकवा देत काढला पळ; झटापटीत महिला पोलीस जखमी