“प्रत्येक हिंदूसाठी आज काळा दिवस”; संजय राऊत कडाडले

मुंबई | राज्याच्या राजकारणात आता हिंदूत्त्वाच्या ज्वलंत मुद्द्यानं एंट्री केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आपल्या आक्रमक हिंदूत्त्वाचा परिचय तीन सभा घेत राज्याला करून दिला आहे.

मशीदीवरील भोंगे उतरवण्यावर ठाम असलेल्या राज ठाकरेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. परिणामी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता उद्भवला आहे.

राज्यात गोंधळ चालू असल्यानं महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे.

हिंदूसाठी आजचा दिवस हा काळा आहे. मनसेला पुढं करून भाजपनं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.

हिंदूत्वसाठी आणि श्रद्धावंतांसाठी आजचा दिवस काळा आहे. उद्या हिंदू रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही. मात्र मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आवाहन करतो की हिंदूंनी संयम राखावा, असं राऊत म्हणाले आहेत.

मशीदीवरील भोंग्याचा निर्णय हा कायद्यानूसार होईल. कायदा हा सर्वांसाठी एक आहे. हा वाद पसरवून हिंदूंमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न आहे. या सर्वामागं भाजप आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

लहान पक्षांनी हाताशी धरून भाजप त्यांचा राजकारणासाठी वापर करत आहे. भोंग्याचा विषय हा कायदेशीर आहे त्यासाठी न्यायव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, भोंग्यावरून राज्यात राजकारण पेटलेलं असताना आता राज्य गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणात बैठका घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका

 जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत….- राज ठाकरे

संदीप देशपांडेंनी पोलिसांना चकवा देत काढला पळ; झटापटीत महिला पोलीस जखमी

‘महाराष्ट्रात माझं सरकार येईल तेव्हा…; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ 

मोठी बातमी! नवनीत राणा यांची प्रकृती पुन्हा खालावली, जे जे रूग्णालयात हलवलं