…म्हणून अनिर्णित राहिला भारत विरुद्ध अफगानिस्तान सामना!

दुबई : दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकाच्या सुपर फोरमधील भारत विरुद्ध अफगानिस्तान सामना अनिर्णित राहिला. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या भारतीय संघासमोर अफगानिस्तानने बराबरी केल्यानं आता अफगानिस्तानच्या संघाचं चांगलंच कौतुक होत आहे. शेवटच्या दोन बॉलपर्यंत अतिशय रोमांचक ठरलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने टीम इंडियाला कडवा प्रतिकार केला आणि सामना अनिर्णित राखला.

शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 7 धावांची आवश्यक्ता होती. भारताचे रवींद्र जडेजा आणि खलील अहमद मैदानावर होते. अफगानिस्तानचा स्टार गोलंदाज राशीद खान हे षटक टाकत होता. पहिल्या चेंडूवर राशीदने कोणतीही धाव दिली नाही. दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाने चौकार ठोकला. त्यापुढील दोन्ही चेंडूवर प्रत्येकी एक धाव मिळाली त्यामुळे भारताला आता 2 चेंडूंमध्ये विजयासाठी एका धावेची आवश्यक्ता होती. षटकाच्या पाचव्या चेंडूवर मात्र रवींद्र जडेजाचा अंदाज फसला. मारलेला फटका हवेत उडाला आणि अफगानिस्तानचा क्षेत्ररक्षक नाजीबुल्लाने तो चेंडू अलगद झेलला. अशाप्रकारे सामना अनिर्णीत राहिला.

Image result for ind vs afg

अफगानिस्तानची सुसाट फलंदाजी-

अफगाणिस्तानचा कप्तान अशरफ अफगाण याने नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमशाद याने बहारदार फलंदाजी करत त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. त्याने तब्बल 124 धावा कुटल्या. निर्धारित 50 षटकांमध्ये अफगानिस्तानने 8 गडी गमावून 252 धावा केल्या. विजयासाठी टीम इंडियापुढे 253 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

भारतीय संघाच्या सलामीवीरांनी जोरदार सलामी दिली. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि अंबाती रायडू यांना सलामीला उतरण्याची संधी मिळाली होती. त्यांनी या संधीचं सोनं केलं. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 110 धावांची भागिदारी केली. मात्र भारतीय संघाचा डाव पुढे ढेपाळला. 49.5 षटकांमध्ये भारताला 252 धावा करता आल्या.

आता भारताचा मुकाबला बुधवारी होत असलेल्या पाकिस्तान बांगलादेश याच्यातील विजेत्याशी होणार आहे. हा सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.