हैदराबादमध्ये ‘विराट’ वादळ; भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

हैदराबाद | पहिल्या T-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर  6 गडी राखून मात केली आहे. 7 गडी राखून पहिला सामना जिंकत भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. कर्णधार  विराट कोहलीनं 50 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद 94 धावांची तूफान खेळी साकारली. त्याच्या महत्वपुर्ण योगदानामुळे भारताला सहा विकेट्स राखून विजय मिळवता आला.

वेस्ट इंडिजच्या 208 धावांचा पाठलाग करताना रोहीत शर्मा लवकरच बाद झाला. त्यानंतर विराट आणि लोकेश राहूलने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत तूफान फटकेबाजी केली. राहूलने 40 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 62 धावांचं योगदान दिलं. याखेळीसह राहूलनं T-20  कारकीर्दीतील 1000 धावा पुर्ण केल्या.

भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजीच्या जोरावर 208 धावांचे लक्ष ठेवलं होतं. सलामीवीर इव्हिन लुईसनं फक्त 17 चेंडूत 40 धावांची लूट केली. लुईसनंतर शिरोन हेटमायरनं 41 चेंडूत 2 चौकार अन 4 षटकारांच्या जोरावर 56 धावांची खेळी केली. पोलार्डनेही 19 चेंडूत 37 धावांच्या खेळीसह आपले योगदान दिलं.

पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजी चांगलीच महागात पडली. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. भारताकडून युजवेंद्र चहलने 2 तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय बल्लेबाजांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत विजय साकारला.

 

महत्त्वाच्या बातम्या-