…म्हणून रोहिणी खडसेंचा पराभव झाला- गिरीश महाजन

जळगाव | तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाला, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांबाबत  स्पष्टीकरण दिलं आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

प्रत्येक निवडणुकीत मुक्ताईनगरची लढत ही चुरशीची असते. मतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने खडसे पराभूत झाले. सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केलं पण मुक्ताईनगरची लढत चुरशीची असल्याने पराभव झाला, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

सर्व पक्षांपेक्षा जास्त ओबीसी आमदार भाजपमध्ये आहेत. भाजप हा ओबीसींना प्राधान्य देणारा पक्ष आहे, असंही गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच भाजपमधील एकही आमदार फुटणार नाही, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.

महत्वाच्या बातम्या-