आमदार दत्तात्रय भरणेंसाठी ‘आजि सोनियाचा दिनु’ होता मात्र….!

इंदापूर |  राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी इंदापुरातली आजची शिवस्वराज्य यात्रेतली सभा एकूणच त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य ठरवणारी होती. मात्र या अतिशय महत्वाच्या सभेला राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे हे दोघेही नेते अनुपस्थित होते. त्यावरून राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

इंदापुरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद आहेत. दोन्ही पक्ष या जागेसाठी अडून बसले आहेत. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे विश्वासू सहकारी आहेत. परंतू अजित पवार हेच इंदापुरच्या सभेला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात कुजबुजीला सुरूवात झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून आपल्या काही कामाच्या कारणास्वत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी वेळ मागून घेतली होती. त्यामुळे दोघे नेते सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. होणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिलं.

दरम्यान, इंदापुरात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडीचं सरकार आणायचंय अशी घोषणा तर केली… परंतू इंदापुरची जागा नक्की कोणाकडे?? यावर स्पष्ट बोलणं मात्र टाळलं.

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या सभेनंतर ते काय पवित्रा घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-