“सुषमा स्वराज, अरुण जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर”

नवी दिल्ली | भाजप नेत्यांचं एकापाठोपाठ एक निधन होत आहे आणि आता पुढचा नंबर नरेंद्र मोदींचा आहे, असं ट्विट ब्रिटीश खासदार लॉर्ड नझीर अहमद यांनी केलं आहे.  

गेल्या दीड वर्षात भाजपाने दिग्गज नेते गमावलेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली हे पाच दिग्गज नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

लॉर्ड नझीर अहमद हे ब्रिटीश संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड’चे आजीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले पहिले मुस्लिमधर्मीय नेते आहेत. भाजप खासदार प्रज्ञा सिंह यांच्या ‘काळ्या जादू’च्या विधानावर टिप्पणी करताना त्यांचा तोल सुटला आहे.

दरम्यान, लॉर्ड नझीर अहमद यांनी केलेल्या ट्वीटने एकच खळबळ उडवून दिली आहे. 

ब्रिटीश खासदार लॉर्ड नझीर अहमद यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

उद्या पवार साहेबांनी सांगितलं राजीनामा दे… तर दुसऱ्या क्षणाला राजीनामा देईल- अमोल कोल्हे https://t.co/XUOUuPlhU9 @kolhe_amol @NCPspeaks @PawarSpeaks #शिवस्वराज्ययात्रा

— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 27, 2019