चीनला आर्थिक झटका देण्याची भारताची तयारी; ‘हा’ प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता

नवी दिल्ली | भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. चीनविरोधात भारत आता कठोर आर्थिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असं अनेकाचं मत आहे.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीचे करार रद्द करण्याची शक्यता आहे. यामध्ये दिल्ली-मेरठ रॅपिड रेल्वे प्रोजेक्टचादेखील समावेश आहे.

दिल्ली-मेरठ आरआरटीएस प्रोजेक्ट रद्द करण्यासाठी सरकारच्यावतीने सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली-मेरठ आरटीएस प्रोजेक्टसाठी अंडरग्राउंड स्ट्रेच तयार करण्यासाठी शंघाई टनल इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड या चिनी कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती. या कंपनीने 1126 कोटी रुपयांची बोली लावली असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, केला मोठा निर्णय जाहीर

-सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानवर होत असलेल्या आरोपांवर सलीम खान म्हणाले…

-ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका

-पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

-भाजप नेते हरिभाऊ जावळेंच्या निधनाबद्दल एकनाथ खडसेंचा धक्कादायक गौप्यस्फोट