“भारत कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसलाय”; मोदी सरकारला संजय राऊतांचा टोला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. भारतावरील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. मात्र, देशातील राजकारणात आरोप प्रत्यरोपाच्या खेळी चालूच आहेत. देशातील लोकांच्या हाताला रोजगार नाही. कोरोनाची लस केव्हा येईल याची खात्री नाही. याच मुद्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

अमित शहा यांच्यासह केंद्रातील सहा मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. भारत कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावरची लस बाजारात आणली, याला म्हणतात महासत्ता! आम्ही मात्र आमच्याच मस्तीत आहोत, असा टोला संजय राऊत यांनी रोखठोक भूमिकेत मोदी सरकारला लगावला आहे.

रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत. ते आजही अमेरिकेच्या प्रेमात पागल आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी लस बाजारात आणली अन् पहिली लस आपल्या मुलीला टोचवून आत्मनिर्भरतेचा एक नवीन आदर्श घालून दिला आहे. मात्र आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचन झाडत बसलो आहोत, असा चिमटा राऊत यांनी मोदींला काढला आहे.

दरम्यान, आज देशातील 14 कोटी लोक बेरोजगार आहेत. संपुर्ण देश चालवणाऱ्या दिल्लीलाही काम नाही. राजकीय आंदोलनं नाहीत म्हणून कार्यकर्ते आळशी झालेत. विरोधक थंड पडले म्हणून राज्यकर्ते लोळागोळा झालेत. दिल्लीत आज एकचं आवाज गुदमरल्यासारखा घुमतोय की आम्हाला काम पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धोनीला कॅप्टन करताना मला खात्री होती की…; शरद पवारांनी केली खास फेसबूक पोस्ट!

जलविष्काराची कमाल; तब्बल 100 हुन अधिक गावात पाणी साठवण

कंगना राजकारणात जाणार का?, ट्रोलर्सच्या या प्रश्नावर अखेर कंगनानं सोडलं मौन; म्हणाली…

आत्मनिर्भर भारताचं पहिले यश; भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी

ऐकावं ते नवलंच! चंद्रावर राहण्यासाठी वैज्ञानिकांनी बनवली मानवाच्या मूत्रापासून वीट; सविस्तर जाणून घ्या