रशियामुळे भारत-अमेरिकेचं बिनसलं?; बायडन यांची नाव न घेता भारतावर टीका

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) या दोन्ही देशात आता घनघोर युद्ध सुरू आहे. दोन्ही राष्ट्र आपापल्या ताकदीने लढत आहेत. अशातच आता युद्ध थांबवण्याचा प्रयत्न अमेरिका करत असल्याचं दिसतंय.

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाबाबत अमेरिका आणि भारत यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जो बिडेन प्रशासनाने गुरुवारी नवी दिल्लीला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राष्ट्रांच्या लीगमध्ये सामील होण्यास सांगितलं आहे.

अमेरिकेने परत बोलावलेल्या केबलद्वारे मॉस्कोचा निषेध देखील केलाय. युक्रेनमध्ये जे काही घडलं त्याबद्दल रशियाला दोषी ठरवण्यात कोणतीही गोलगोल बोलून किंवा नाटकी करू नयेत, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी क्वाड देशांची आपत्कालीन आभासी बैठक बोलावली. त्यात त्यांनी युक्रेनच्या मुद्द्यावरून भारताला जाहीरपणे रशियापासून दूर ठेवण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्न केला.

या बैठकीत सहभागी झालेल्या जपान आणि ऑस्ट्रेलियाने रशियाचा निषेध करत अमेरिकेशी हातमिळवणी केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात युक्रेनचा मुद्दा क्वाड अजेंडामध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला होता.

गोलगोल बोलून किंवा नाटकी करू नयेत. आपल्याला संघटित होऊन रशियाला त्याच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे, असं म्हणत बायडन यांन भारतावर नाव न घेता टीका केल्याचं जाणकारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रशिया हा भारताचा परममित्र मानला जातो. रशियाने युद्धाच्यावेळी भारताला मदत केली होती. त्यामुळे भारताने यावेळी तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र, याचा परिणाम आता भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीवर होणार की काय?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या – 

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

 धोनीनं केलं ट्रॅफिक जॅम! भर रस्त्यात उभी केली बस अन्…; पाहा व्हिडीओ

“भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवा”

 ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू”