युक्रेनचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं, वादात भारत मध्यस्थ होणार?

नवी दिल्ली | युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाचं रुपांतर आता मोठ्या युद्धात झालं आहे. आज सकाळी पुतीनने या युद्धाची घोषणा केली.

युक्रेनने रशियासमोर हार न मानता बलाढ्य़ अशा रशियाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशाचे सैन्य प्राणाची बाजी लावत लढताना दिसत आहेत.

अशातच आता या युद्धाचा परिणाम जगभरात होताना दिसतोय. युक्रेनचं लष्करी ताकद रशियाच्या तुल्यबळाने कमी असल्याने आता युक्रेन वेगवेळ्या पर्यांयाचा विचार करत आहे.

अशातच आता युक्रेनने रशियाचा मित्रराष्ट्र असलेल्या भारताकडे मदतीचं साकडं घातलं आहे.युक्रेनच्या भारतीय राजदुतांनी म्हणजेच डॉ. इगोर पोलिखा यांनी भारताकडे मदतीची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करावी आणि त्यांना हे युद्ध थांबवण्यास सांगावं, असं राजदूत म्हणाले आहेत.

युक्रेनवरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाची तातडीची बैठक घेण्यात आली.

दरम्यान, भारताने या वादात मध्यस्थी केल्यास भारत आणि परममित्र रशिया यांच्यात मैत्रीत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

रशिया-युक्रेन युद्धाचा मद्यप्रेमींनाही झटका; आली ही महत्त्वाची माहिती समोर

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सुचना!

“संजय राऊतांची मानसिक स्थिती खराब झालीये हीच आत्ताची ब्रेकिंग न्यूज”

Russia-Ukraine War: युक्रेनसोबत रशियाचं नेमकं भांडण काय?, वाचा सविस्तर

पावनखिंड चित्रपट पाहणाऱ्यांना ‘या’ ठिकाणी मिळणार मिसळवर बंपर डिस्काऊंट