रशिया-युक्रेन युद्धाचा मद्यप्रेमींना मोठा झटका!

नवी दिल्ली | सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून पेटलेला रशिया आणि युक्रेनचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज युद्धाची घोषणा करून जगाला टेन्शन दिलं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केल्याने आता जगाचं लक्ष या भागाकडे लागलं आहे.

या दोन्ही देशांच्या वादात आता जगाला मोठं नुकसान होत असल्याचं पहायला मिळतंय. या युद्धाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमती आणि शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.

अशातच आता रशिया-युक्रेन युद्धाचा मद्यप्रेमींना देखील मोठा झटका बसल्याचं पहायला मिळतंय. मद्यनिर्मितीसाठी पूरक असलेल्या खाद्यान्याच्या किंमती तुटवड्यामुळं वाढणार असल्याची शक्यता आहे.

खाद्यान्याच्या किंमती वाढणार असल्याने वाईन आणि बिअरच्या किंमतीवर याचा थेट परिणाम होणार आहे. रशिया सातू किंवा बार्ली उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

त्याचबरोबर यूक्रेन देखील या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता सातूच्या किंमती गगनाला भिडताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात मद्याच्या किंमती वाढू शकतात.

दरम्यान, या युद्धाचा परिणाम गहु उत्पादक शेतकऱ्यांवर देखील परिणाम होणार आहे. हे युद्ध असच चालत राहिलं तर गव्हाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सुचना!

“संजय राऊतांची मानसिक स्थिती खराब झालीये हीच आत्ताची ब्रेकिंग न्यूज”

Russia-Ukraine War: युक्रेनसोबत रशियाचं नेमकं भांडण काय?, वाचा सविस्तर

पावनखिंड चित्रपट पाहणाऱ्यांना ‘या’ ठिकाणी मिळणार मिसळवर बंपर डिस्काऊंट

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका; ‘या’ गोष्टी महागणार