भारत कोरोनाचं संकट संधीमध्ये बदलेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या संकटाला भारत संधीमध्ये बदलेल. भारत आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करेल. आज आम्ही ज्या गोष्टी आयात करतोय, उद्या त्याच सर्वाधिक निर्यात करु, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आत्मनिर्भर भारताचा अर्थ होतो. कोळसा खाणी व्यावसायिक खाणकामासाठी देऊन आम्ही कोळसा उद्योगाला दशकाच्या लॉकडाउनमधून मुक्त करत आहोत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. ते व्यावसायिक खाणकामासाठी 41 कोळसा खाणींच्या लिलावाच्या कार्यक्रमात बोलत होते.

कोळसा खाणीमध्ये भारत जगातील चौथा सर्वात मोठा देश आहे. पण भारत कोळसा निर्यात करत नाही. उलट कोळसा आयातीमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर आहे. 2014 सालानंतर ही परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली, असं मोदींनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोळसा लिंकेजचा कोणी विचार करु शकत नव्हतं, ती गोष्ट आम्ही करुन दाखवली, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-…तर ही विधानपरिषदेची ब्याद मला नकोच- राजू शेट्टी

-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी; रिया वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल

-सुशांतबाबत ती पोस्ट करणं करण जोहरला पडलं भारी; इतके लाख फॉलोअर्स झाले कमी

-“…अन् आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघालेत, याचं आश्चर्य वाटतं”

-“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”