सुशांतचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या टीमनं घेतला मोठा निर्णय

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या टीमने त्याचे विचार शेअर करण्यासाठी एक वेबसाइट लाँच केली आहे.

या वेबसाइटचे नाव सेल्फम्यूजिंग डॉट कॉम selfmusing.com असं आहे. तसेच ही वेबसाइट सुशांतचे स्वप्न असल्याचा खुलासा टीमने केला आहे.

सुशांतच्या टीमने सोशल मीडियावर त्याच्या वेबसाइटची लिंक शेअर करत ‘तो आपल्याला सोडून गेला असला तरी त्याच्या आठवणी आपल्यामध्ये आहेत. आम्ही सुशांतची #selfmusing वेबसाइट लाँच केली आहे. सुशांतसाठी चाहतेच गॉडफादर होते’ असं म्हटलं आहे.

सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्याने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-भारत कोरोनाचं संकट संधीमध्ये बदलेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

-…तर ही विधानपरिषदेची ब्याद मला नकोच- राजू शेट्टी

-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी; रिया वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल

-सुशांतबाबत ती पोस्ट करणं करण जोहरला पडलं भारी; इतके लाख फॉलोअर्स झाले कमी

-“…अन् आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघालेत, याचं आश्चर्य वाटतं”