मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी दिल्ली | रशिया-युक्रेनमध्ये सध्या जोरदार युद्ध पेटलं आहे. रशियानं आपल्या सर्वशक्तिमान सैन्याला कसल्याही परिस्थितीत युक्रेनवर ताबा मिळवण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी मोठा रक्तपात घडत आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा सरळ फटका भारताला बसत आहे. देशातील तब्बल 16 हजारांहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशा परिस्थितीत देशात सध्या चिंतेचं वातावरण आहे.

युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन गंगा मोहिम सुरू केली आहे. अशातच सर्वांसाठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याच मृत्यू झाला आहे.

खारकीवजवळ झालेल्या गोळीबारात मोठी हानी झाली आहे. मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थी तिथं अडकून पडले आहेत. अशात त्याठिकाणी उपस्थित असलेल्या वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मृत्यू पावलेला विद्यार्थी हा वैद्यकिय शाखेच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी दुतावासाकडून संपर्क करण्यात आला आहे.

शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असं मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. नवीन हा मुळचा कर्नाटकमधील आहे. भारत सरकारच्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा मोहीमेला मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.

रशिया-युक्रेन या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी दोन्ही देशांनी भारतीय विद्यार्थ्यांना हानी पोहचणार नाही याची काळजी घेण्याची हमी दिली होती.

युद्ध चालू असताना सर्व दिलेले शब्द हे कसल्याही उपयोगाचे ठरत नाहीत याची प्रचिती भारतीय विद्यर्थ्यांच्या हालअपेष्टावरून देशाला आली आहे. असं असतानाच आता या मृत्यूनं देशात खळबळ माजली आहे.

महत्त्वाच्या बातमी – 

 मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी