8 दिवसांनंतर अखेर इंदोरीकर महाराजांनी नमतं घेतलं….! म्हणाले…

अहमदनगर | पुत्रप्रातीसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला दिल्यापासून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर अडचणीत आले आहेत. NCPNDT या कायद्यांतर्गत त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे तर अंनिसच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता महाराजांचे पाठीराखे आणि टीकाकार एकमेकांवर तुटून पडले आहेत. मात्र आता इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलगीरी व्यक्त केली आहे.

माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने विपर्यास केला आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं महाराजांनी म्हटलं आहे.

मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. गेल्या 26 वर्षांपासून समाजप्रबोधनाचं आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचं मी काम करत आहे. गेल्या 26 वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही प्रयत्न केले. मात्र माझ्या कीर्तनातील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं माफीनाम्यात त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराजांनी मागितललेल्या या माफीने आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुकाराम महाराजांचे वंशज म्हणतात, ‘इंदोरीकरांमुळे कीर्तनाचा दर्जा घसरतोय!’

-“तृप्ती देसाई, तुम्ही नगरमध्ये पाय ठेवून दाखवाच”

-गेल्या 25 वर्षात इंदोरीकरांनी समाजात मोठ्या प्रमाणात प्रबोधन घडवलं- बाळासाहेब थोरात

-मोर्चाचं नियोजन केलंय पण भाजपचे कार्यकर्ते तर बिळात शिरलेत- नवाब मलिक

-वादग्रस्त वक्तव्यं टाळा; लक्षात ठेवा सरकार पाच वर्ष टिकवायचंय- शरद पवार